जिवंतपणी का प्रेमाची किंमत कळत नाही?????

सरू म्हणजे माझ्या गावातील एक आमच्या समोरच्या खोपटात राहणारी माझ्याच वयाची...... आमच्या घरासमोरच्या अर्धवट बांधलेल्या घराच्या उरलेल्या दगडावर बसून उस खात  उसाच्या चुट्ट्या फेकत बसणारी...
स्वछंदी आनंदी.... मला तिचा फार राग यायचा.... कारण ती माझ्या प्रत्येक गोष्टीत मधे मधे करायची... आडवे तिडवे बोलायची..... दररोज यायची आणि कसल्या ना कसल्या गोळ्या मागायची.....  नेमके आई नसली कि मगच यायची..... मी कुठून हिला गोळ्या देणार??? मी तिला असेच पराचीतोमोल वगैरे देऊन कट वायचो .... ती मंद त्याच घेऊन जायची.....मला तर धड गोळ्यांची पुडी पण नित बांधता येत नसायची..... मग लगेच तिचा काहीतरी टोमणा..... हिला काय गरज आहे...... गोळ्या भेटल्या ना??? गप निघावे आपले........ पण नाही उगाच काहीतरी आपला मूर्खपणा.....
आमच्या सरांची मुलगी वैष्णवी..... खूप सुंदर दिसायची.... (खूप सुंदर दिसायची म्हणजे आवडायची असा अर्थ नेहमीच काढू नये.....) पण आम्ही बऱ्याच वेळी बरोबर असायचो...... मला तिच्यासोबत असणे चांगले वाटायचे......
सरू आम्हाला पहिले कि मुद्दाम काहीतरी मला टोचून बोलायची..... असे वाटायचे हिच्या अशी एक कानाखाली ओढावी कि आयुष्यभर आठवण ठेवील...... एकदा चिंचेच्या झाडाखालून चाललो होतो....  वैशुला चिंचा खाण्याचा मोह झाला..... मी खालीच दगड गोळा केले आणि झाडावर मारले.......पण साल्या चिवट चिंचा इकही पडेना..... वैशू  म्हटली जाऊदे....  आणि आंबट तोंड केले..... तितक्यात हे ध्यान कुठून एके आणि सरसर झाडावर चढले..... वरून गरासलेल्या चिंचांचे घोस खाली फेकले आणि ओरडली "ये मास्तरचा पोरी खा पोटभर....." मी म्हटलो "खाली उतर काना खाली जाळ काढतो तुझ्या..... " काही बोलायची पद्धत.... मास्तरची पोरगी म्हणजे काय...... काही नाव गाव आहे कि नाही..... मूर्ख आणि उद्धत कुठली.....
  आम्ही शाळेत होतो हि कधी शाळेत आलेली मला आठवली नाही...... पण मास्तर तिला पुढच्या वर्गात ढकलायचे ...... तशी ढकलगाडी ती एकटीच नवती..... खूप नमुने असे होते ज्यांना पुढे ढकलावे लागे...... कसेबसे दहावीपर्यंत पोहोचलो..... मी मनात फार आनंदी होतो कारण आता खरी लायकी कळेल असा माझा कयास होता आणि तो बऱ्याच अंशी खरा होता.......

सरूचा दहावीला इंग्रजीचा विषय राहिला..... मला मी दहावीला शाळेत पहिला आणि केंद्रात तिसरा होतो याचा जेवढा आनंद होता त्यापेक्षा सरू नापास झाली याचा आनंद जास्त होता.....  कुठेतरी मी तिला हरवलेले होते..... नाहीतर प्रत्येकवेळी ती सरस होती.... फक्त अभ्यासात ती मागे होती आणि मला ते जास्त खटकायचे....... सगळ्या बाबतीत मला चांगले म्हणावे हि अपेक्षा होती ...... आणि ती त्याला दरवेळी चेद देत होती..... आज कुठेतरी माझ्या मनाजोगे झाले होते.....  आणि तिला मी पहिला आल्याचा आनंद झाला
तिला याचा गंधही नवता..... तिची आई माझ्या आईला भेटायला आली.... निकाल विचारला..... आणि म्हटली.... माझ्या पोरीला इंग्रजी वाचता जरी आले ना तरी तुमच्यासारखे नर्सिंगला पाठविण..... औषधावरची नवे जरी वाचता आली ना तरी बरे होईल..........माझ्या आईला त्याचे फार वाईट वाटले ....... तिचे संवेदनशील  हृदय म्हटले  गरीब अशिक्षित आईची भोळीभाबडी आशा..... मी तर सातवे असमान पार होतो...... आता माझ्या लेखी तिला काडीचीही किंमत नवती....
       पुढे ११ वी बारावीला नाशिकला गेलो.....  नाशिकला गेल्यावर माझा तहात अजून वाढला...... सरूचा संबंध संपला होता...... ती आईला विचारायची अधून मधून..... मला त्याचा पण राग यायचा...... पुढे इंगीनीरीन्ग्ला अमृतावाहीनीला गेलो.... माझ्यातला शिष्टपणा कमी होत नवता..... पहिले आईचा दुपारच्या जेवणाच्या वेळी एक मजेदार नियम होता..... ती जेवायला बसली कि म्हणायची...." जा रे सरूच्या मम्मीने काय भाजी केली घेऊन ये....." मी तिच्या कोपिकडे(खोपटा कडे ) जायचो आणि तिला ऑर्डर सोडायचो.... "सरू.... आईने भाजी सांगितली....."  काकू म्हणायचा अरे ये कि घरात..... बाहेरूनच काय ओरडतो..... मला लाज वाटायची ..... त्या दळभद्री खोपटात मी कसा जाऊ,,,,, !!!!
इंगीनीरीन्ग्ला गेल्यावर मी खोपाताकडे जायचे बंदच केले..... (हमारी शान के खिलाप था वाहा जाणा....)
............................................बऱ्याच दिवसांनी आईनी फोनवर सरुचे लग्न जमल्याचे  सांगितले..... माझ्या अंगावर इकदम शिरशिरी आली .... पण इतके काही जाणवले नाही....... मनात सूक्ष्म हालचाल होत होती..... पण जाणवत नव्हती .... इंग्ग्चा हा फार मोठा तोटा आहे जाणीव बोथट होतात....
सरूचा लग्नाला विरोध होता. का कुणालाच माहित नाही....... आईने इकदिवस मरोस्तोवर मारली..... हातचे स्थळ करान्तीने घालवले म्हणून...... तिची इवढ्यात चिडचिड जास्त वाढली होती.....
एकदिवस अचानक आईचा फोन आला..... सरुने पेटून  घेतले म्हणून...... मी प्रचंड घाबरलो....... काय कारण घडले आसवे हा विचार करत होतो......  पण परीक्षा चालू होती..... आणि ती अशीपण माझ्यासाठी फार महत्वाची नवती....... कि मी परीक्षा सोडून बोंबलत तिच्याकडे जावे...... तिने पेटून  घेतले होते पण जीव वाचला होता..... फक्त अंथरून नाला खिळली होती..... मी बऱ्याच दिवसांनी घरी आलो ... आल्या आल्या आईने तिच्याकडे जायला सांगितले..... कारण ती दररोज आईला विचारायची माह्या आला का ?? म्हणून आणि आई नर्स असल्याने तिच्याकडे जावे लागे.... मला वाटले काय कटकट आहे..... पण आईने जास्त फोर्स केल्याने माझा नाईलाज झाला .... तिच्या खोपताकडे गेलो..... ती वर्षानुवर्षे चुलीच्या धुराने काळी कुट्ट झालेली झोपडीत मला जावेना.... पण मन मारून गेलो तिथे........ समोर सरू पडलेली होती...... चेहरा जास्तच विद्रूप झाला होता..... तश्या स्थितीत्पण तिच्या चेहऱ्यावर समर्पक भाव झळकले...... मी बाजूच्या सतरंजीवर बसलो .... कधी उठून जातो अशे झाले होते..... तेवढ्यात क्षीण आवाजात ती म्हटली तेवढ्या गोळ्या देतोस का??/ म्हणून इक पिवळ्या डब्ब्याकडे बोट दाखवले........ चुलीच्या धुराने पिवळा झाला असावा बहुतेक...... मी डब्बा उधडला त्यात अनेक छोट्या छोट्या पुड्या बांधलेल्या होत्या..... मी म्हटलो कुठली देऊ????? ती म्हणाली कुठली पण दे...... मला जरासे विचित्रच वाटले पण काढल्या दोन गोळ्या...... ती हसली...... का माहित नाही..... मी दोन गोळ्या उंचावरूनच तिच्या हातावर सोडल्या...... त्या जळलेल्या हातांचा मला स्पर्श मला नकोसा होता !!! तिचा चेहरा क्षणात काळवंडला...... मी मात्र निखर ट होतो..... तिचा निरोप घेतला.... आणि कॉल्लेगेला निघून गेलो...... नंतर मला आठवणीत आले त्या पिवळ्या डब्ब्यात...मीच चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गोळ्यांच्या पुड्या होत्या....
तिने इतके दिवस  जपल्या होत्या.... आणि त्या Expiry date   संपलेल्या गोळ्या खाऊन तिने स्वताला संपवले.......

हि झाली काल्पनिक कथा पण....
आयुष्यात जगताना कधी आपण सरू असतो तर कधी माह्या...... खर प्रेम कळण्यासाठी सरूला किवा मह्याला  जग सोडावेच लागते का?????? जिवंतपणी का त्यांच्या प्रेमाची किंमत कळत नाही?????

3 comments:

  1. Mahendra, apratim. Saru awadli :)

    ReplyDelete
    Replies
    1. story lihinyacha pahila prayatna hota ..... itaka kahi khas navhata jamala .

      Delete