थोडासा रोमांटीक हो जाये.....

रस्त्यावरले दगड सोडून कुणीही.....
रिक्षा पोस्टाची खिडकी आणि मी यात सर्वात महत्वाचे कोण आहे प्रिये????
प्रिये हे संबोधन......
तू टाचा उंच करून माझ्या शर्टाचे वरचे बटन लावावे
आणि दोरा देखील तोडावा तुझ्याच दातांनी.....
इतक्या खाजगी हक्काचे.....
कविता संदिपचीच आहे.....
मी फक्त खाजगी हक्क बदलला......
तू म्हणशील महेंद्र  शिंदे सर आणि अशी रोमान्तिक कविता........
इथे हे वाचणार्या प्रत्येकाचा मनात हाच प्रश्न आहे.........!!!!
पण आहे ते आहे.......
तू चष्म्याच्या अर्ध्या जास्ती काड्यान मधून वर
 बघत नेहमीप्रमाणे  हसत हसत म्हणशील.....
 वेडा आहे......
इथे प्रत्येक जन थोडाबहुत वेडाच आहे.....
पण तुझे वेड वेगळे....... माझे वेड वेगळे....... ;)
माझ्या या वेडाचीसुधा  जात वेगळी आहे ......
कारण मी माणूसच वेगळा आहे.....
तू घरी आलीस तेव्हा मी म्हटलो...
ते बघ ते बदामाचे झाड...
तू अगदीच अरासिकातेने  म्हटले... .. "मला माहिती आहे....."
झाड माहिती असेल ग...
पण त्या बदामाचे गुपित माहित आहे का??
...माझ्यासारखेच आहे......
त्या पानांना देखील प्रेमाची जाणीव पानगळ होताना होते......
म्हणून तर ती पिकली पाने लाल असतात आणि
प्रेमाची निशाणी देखील लाल बदाम  असते.....
..........................................................................
कसेही असले तरी मी तुझी वाट पाहीन......
अगदी वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत
तू पुन्हा खोचकपणे विचारशील.... मग काय लग्नच करणार नाहीस काय तोपर्यंत..??
हो करणार कि प्रिये....
"नालायक...".(तुझे उद्वेगपूर्ण उद्गार....!!!!)
पण तरीसुद्धा वाट तुझीच पाहीन.....
आयुष्यभर ना सही निदान आयुष्याच्या संध्याकाळी तरी तू माझ्या सोबत असशील......
...........................निदान तेव्हा तरी येशील ना?????


No comments:

Post a Comment