क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 7


आता मी दुसऱ्या   मुलींच्या रूमवर शिफ्ट झाले आमची रूम मला सोडावी लागली प्रणाली मधु आणि आश्लेषा यांच्या रूमवर मी जर भीत भीतच राहायला गेले …
प्रणाली आणि आश्लेषा एटीसी च्या होत्या मधु आणि मी क्लासमेट !!! प्रणाली म्हणजे वेद ची गर्लफ्रेंड !!  तश्या मधु आश्लेषा पण एंगेज होत्या पण …. !!
प्रणाली सारखी फोनवर बोलायची …. मला वाटायचं हि खरच बोलते कि उगीच दिखावा म्हणून …। मी एक दिवस फोन पण चेक केला तिचा… वेद चं नाव वेडू नावाने सेव केलेलं मी इतकी बिनडोक कि किती ह्वर्स हे बोलले मी पडताळून बघितलं …. पुन्हा तसंच अंगात कुणी पाणी ओताव तसं झालं  …. आपलं मन खरच किती बावळट असतं ना !!! तिचा फोन वाजला जरी ना तरी पायाला घाम यायचा …छातीत धस्स व्हायचं . वेदचाच असेल का !!! वेद चा फोन नसला कि मला बरं वाटायचं !!!  खरं तर मी मनाला खूप समजवायचे कि वेद प्रणालीचा आहे !!!! पण मन खट्टू झाल्यावाचून राहायचं नाही …. !!! किती विचित्र असतं ना !!!
माझी क्लास मधली इमेज म्हणजे खूपच सोज्ज्वळ मुलगी अशी झाली होती …. !!! कधी कधी राग यायचा स्वतःचा … मला पण कुणी प्रपोस का करत नाही यार [पन हे मनाच्या कप्प्यात कुठतरी खोलवर जाणवायचा ] !!!!  
सेकंड यिअर ला डायरेक्ट अडमिशन वाली डिप्लोमाची मुलं आमच्या क्लास मध्ये आली … त्यापैकी लक्षात राहण्याजोगा म्हणजे सौरभ मराठे !!! ड्याशिंग … क्लासला ओळख करताना अशी करून दिली …मी मंदार मराठे ९६ कुळी मराठा !!! वास्तविक जातीचा उल्लेख करायची काहीच गरज नव्हती … पण ज्वलंत अभिमान !!!
आवाज खणखणीत !!! तरतरीत … रंगाने गोरा धिप्पाड !!!! उशिरा अडमिशन झाल्याने जास्त ओळखी काही झाल्या नाही डिप्लोमा वाल्यांशी … सौरभ हटके होता म्हणून लक्ष्यात राहिला !!!
२-३ महिने गेले …लगेच परीक्षा आली …. या वे
ळेस मात्र पीलला घरी नाही गेले …. रूमवरच राहिले … !!! अभ्यास केला …।
परीक्षा छान गेली …. परीक्षा संपल्यावर प्रणालीने आमची आणि वेदची ओळख करून दिली …. तो म्हटला मी ओळखतो तिला …. मी खुदकन हसले … वेदने प्रणालीला आणि आम्हाला पार्टी दिली  पण शेवटपर्यंत मी मान वर करून पाहू शकले नाही …। वेदचा हात तिने हातात घेतलेला मला झुकल्या नजरेने पण दिसला …। पोटात उचंबळून येत होतं … पण थांबले !!!  मला १स्ट क्लास मिळाला !!! रिझल्ट च्या दिवशी या वेळेस बाबा आले होते !!! बरं वाटलं ।
नवीन सेमिस्टर ला आमच्या प्रक्टिकल मध्ये  मंदार मराठे !!! नाव वाचून हसूच आलं … कारण आता ल्याब मध्ये फक्त हश्याच  होणार होता !!!!


No comments:

Post a Comment