क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 13

माझ्या दुर्दैवाने माझी पाठ काही सोडली नाही . संकटं आणि दुर्दैव या गोष्टी खरं कधीच एकटे  येत नाही . ते येताना सोबतीला आपला लवाजमा घेऊन येतात . मी सविताच्या घरी गेले आणि इकडे माझे वडील माझ्या रूमवर आले . फोन वगैरे न करता . बहुधा संशय या व्याधीने त्यांना ग्रासले होते . मी रुममध्ये नव्हते . रूम मेट त्यांना म्हणाल्या की ती आज येणार नसल्याचे सांगून गेलीय .  कुठे गेलीय हे बाबांना त्यांना विचारावेसे वाटले नाही आणि त्या हलकट पोरींना सांगावेसे वाटले नाही . ना कोणी मला फोन करून सांगण्याची तसदी घेतली . कधीकधी जवळची माणसं सुद्धा वैऱ्या सारखी वाटतात . वडिलांचं बीपी वाढलं . त्यांनी तिथेच राहून घेतलं . मी दुसऱ्या दिवशी सविताच्या घरून उशिरा निघाले . त्यामुळे सकाळचे दोन लेक्चर बुडाले . आता कश्यातच मन लागत नव्हतं म्हणून त्या लेक्चर चं पण काही वाटेनासं झालं . पण बाबा सकाळीच ला हजार . मी वर्गात आहे कि नाही विचारलं . आणि बाहेर वऱ्हांड्यात उभे राहिले माझी वाट पाहत . मी येतांना त्यांना दिसले . मीही  त्यांना पाहिलं . माझ्या पायाखालची जमीन सरकल्या सारखं झालं  . आधीच मोठं रामायण झालं होतं आता पुढं काय होणार हे स्पष्ट माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागलं . त्यांनी क्लासच्या बाहेरच कुठे होती रात्रभर म्हणून मोठ्या आवाजात विचारलं , सगळा क्लास बाहेर बघायला लागला . वडील लालबुंद झाले होते . क्लास बाहेरच रोशन जगताप उशीर झाला म्हणून थांबला होता . सविताने दांडी मारली होती . रोशन बघत होता . मी थंड राहून सांगितलं मी सविताकडे होते . "कुठ आहे ती बोलाव तिला " , "ती नाही आलीय आज ", मी सांगितलं . त्यांनी मला लगेच सर्व समान आवरून शिवाजीनगर ला यायला सांगितलं . सविताच्या आईने विरोध कर म्हणून सांगितलं पण इथे विरोध करण्याची क्षमताच गमावून मी बसले होते . यांत्रिकपणे हालचाल करत होते . कधी नव्हे ते मी पण लालबुंद झाले होते . मन काही बोलले तर वडील आणखी भडकतील आणि काट्याचा नायटा होऊन जाईल असे परिस्थितीच सांगत होती . मला रडू येत नव्हतं . मी धुमसत होते . मी समान उचललं आणि शिवाजीनगर गाठलं आम्ही दोघांनी . आता परत इंजिनीरिंगला येता येईल कि नाही सांगता येत नव्हतं .


No comments:

Post a Comment