अच्छा लागता है !!!

पुष्कळ लोक विचारतात तू (folk-culture) लोक संस्कृतीचा अभ्यास करतो …. काय उपयोग आहे त्याचा …. अनावश्यक वेळ आणि पैसा खर्च होतो . सोडून दे हा नाद …. वगैरे वगैरे …. पण खरं सांगू का आपल्याला जे आवडतं माणसाने ते मनापासून करावं . आणि राहिला प्रश्न दुर्लक्षित असलेली फिल्ड … आणि त्यातही देव देवतांचा त्यातही म्हळोबा बिरोबा विठोबा खंडोबा यांसारख्या अनार्य देवतांचा अभ्यास म्हणजे बर्याच परिवर्तन वाद्यांना अधोगामित्वाकडे वाटचाल वाटत असावी …पण वस्तुस्थिती हि आहे कि आपल्या देशात शतकानुशतके वेगवेगळ्या देवतांची पूजा आपण मूर्ती च्या रुपात बांधत आलो …. उद्या येणारी पिढी आपल्यासारखी अंधानुकरण न करणारी पिढी असणार आहे ते जेव्हा एखाद्या वीरगळाकडे बोट करून विचारतील कि हे काय आहे …. शेंदूर फसलेला लालबुंद दगडापुढे नारळ का फोडायचा … तर माझ्याकडे मोघम उत्तर असून चालणार नाही … हजारो वर्षांचा इतिहास … परंपरा … यांचं माझ्यालेखी तरी प्रचंड मोल आहे. आणि हा शतकानुशतके जपलेला वारसा सर्वांच्या समोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे तो जपण्याचा मानस आहे …. देव मानने किवा न मानणे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे …. लोक संस्कृतीने[folk culture] किवा तिच्या अभ्यासाने माझ्या मनाला शांती मिळते आणि मला वाटतं कि या आत्मशान्तिला शोधूनच प्रत्येकाने जगावं !!! अच्छा लागता है !!!