क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 17

 किशोरची आणि माझी म्हणजे आमची नवी बाईक आली . रॉयल एन्फिल्ड . रॉयल लोकांची पसंती . मला नेहमी वाटायचं माझ्या नवऱ्याकडे अशी रॉयल गाडी असावी . मला आठवीत असल्यापासून गियर ची गाडी चालवता यायची . नंदू काकाने मला बुलेटवर शिकवलं होतं तेव्हापासून मी बुलेटच्या प्रेमात होते . काका शिक्षक होते पण बुलेटवर रुबाबात जायचे आम्हाला खूप हेवा वाटायचा . म्हणून किशोरने मुद्दाम घेतली होती . 

सुखी संसाराचे स्वप्न पाहायला माझी सुरुवात झाली होती .  किशोरने मला अँड्रॉइड फोन गिफ्ट केला . खूप भारी वाटलं .  बुलेटचा आवाज आला जी वाटायचं किशोरच आला . हुरहूर लागायची . कधी फोनवर बोलू असं व्हायचं . मेसेज आला की कधी बघते असं व्हायचं . किशोरला  पुणे जिल्ह्यात  तलाठी पोस्ट मिळाली होती . मुली मला किशोर आला कि म्हणायच्या तुझा सातबारा आला बघ . खरंच माझा सातबारा झाला होता किशोर . सर्वस्व झाला होता . एक दुजे के लिये . 

किशोर पुरंदर जवळ वाल्हे येथे  तलाठी म्हणून  रुजू  झाला . पुण्याला काम आहे सांगून तो आणि मी दिवसभर मस्त फिरायचो .  शिव कैलास ची रबडी कुल्फी त्याला खूप आवडायची .

बुलेटवर जाताना मुद्दाम मी त्याला चिमटे काढायची . माझा भोळा सांब कधी चिडला नाही . 

किती मैत्रिणींनी मला त्याच्या शिक्षणावरून बोलणे केले होते निगेटिव्ह केले होते पण माझा नाईलाजाने का होईना घेतलेला निर्णय माझ्या आयुष्यातला सर्वोच्च आनंद होता . मी त्याच्या अंगावर पाणी शिंपडायची , तो फक्त हसायचा .  एकदा फक्त त्याने ओंजळीत पाणी घेतले माझ्या अंगावर टाकायला . मी म्हटलं टाक चल आणि त्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जाऊ लागले . तो एक एक पाउल मागे जाऊ लागला . मी खळखळून हसू लागले . 

तो आणि मीच होतो वाघेश्वर च्या मागे . माझी खूप इच्छा झाली होती की  किशोरला बिलगावे किंवा  त्याने आपल्या मिठीत घ्यावे . पण किशोर अजून लाजाळूपणाच्या कोषातून बाहेर यायचा होता . आणि मी त्यामुळेच  त्याची खूप मजाक घेत असायची . 

परीक्षा संपल्या होत्या . किशोर आणि मी दोघे बाईकवर घरी जाण्याचा विचार करत होतो .

 


No comments:

Post a Comment