क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 15

मी पुण्याला परतले ते किशोरशी साखरपुडा करूनच . मी वडिलांना माझं शिक्षण पूर्ण करीन मग लग्न करू अशी अट घातली . वडिलांनी ते मान्य केलं . आत्याने इंदोरहून माझ्यासाठी साड्या मागवल्या होत्या . मला सगळं मेक्यानिकली चालल्यासारखं वाटत होतं . आत्त्याच्या बहुतेक ते लक्ष्यात आलं असावं . पण काही बोलल्या नाही .
ह्या सगळ्या प्रकारचा परिणाम माझ्या अभ्यासावर झाला . माझी सगळी युनिट टेस्ट बुडाली होती . आणि मला पुन्हा सगळं असाइन मेंट वगैरे पूर्ण करायचं होतं .  पुन्हा सबमिशन येणार होतं . माझ्या क्लास मधील मित्रांनी समजुतदारपणा दाखवला . मला कुणीही झालेल्या प्रकाराबद्दल काही बोललं नाही . जसं  काय काही झालंच नाही . माझा साखरपुडा एका ग्रामसेवाकाशी झाल्याची गोष्ट मात्र कुणाला फारशी रुचली नाही .  पण कुणीही उघडपणे बोललं नाही . सविताला सगळी परिस्थिती माहिती असल्याने तिने सगळ्यांना माझ्या घराच्या वातावरणाची कल्पना दिली होती . संध्याकाळी किशोरचा फोन आला . त्याने थेट विचारलं  लग्नाला तुझी संमती आहे ना ? या प्रश्नाने मी थोडी गांगरून गेली होती . पण तरी म्हटले नाही असं  काही नाहीये . थोडी घाई झाल्यासारखं वाटतंय इतकंच .
यावर त्याला बरं वाटलं असेल . थेट नाही पेक्षा माझा उत्तर सौम्य होतं . आता नाही शक्यही नव्हतं म्हणा .
मग रोज संध्याकाळी त्याचे फोन सुरु झाले .  मला म्हणे लग्न झाल्यावर तुझे  पुढचे शिक्षण पूर्ण करीन . वगैरे .
ओरल चालू झाल्या . माझ्या मागे मंदार असायचा आणि आता रोशन जगताप . तो खूप कमी बोलायचा . अगदी मोजकंच त्यामुळं तो कसा आहे याचा वेध घेता येत नव्हता . शिवाय बाबा माझ्यावर कॉलेज च्या कोरीडॉर मध्ये माझ्यावर ओरडत होते तेव्हा तो त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी होता . मी ओरल मधून रडतच बाहेर आले . पहिल्यांदा मला इतकी अवघड ओरल गेली होती . माझी सगळ्यांनी विचारपूस केली . मला External पुढच्या वेळेस ये ओरलला असं म्हटले होते आणि त्याचाच मला अनखर वाटला होता   रोशन माझ्या नंतर गेला . तो हसत बाहेर आला . बहुदा त्याला ओरल चांगली गेली असावी . मी रूमवर जातांना त्याने मला गाठलं . मला canteen  मध्ये घेऊन गेला . मला शांत केलं  आणि म्हणाला फारसं अवघड नसतं ग पास होणं , पैसे दिले कि सगळे कामं होतात . प्रिन्सिपल सकट सगळे पैसे खातात . strategy असते त्यांची घाबरून द्यायची आणि पैसे काढायची .
मी हा सगळा प्रकार पहिल्यांदाच ऐकत होते . पैसे देऊन ओरल काढायची … शी मनाला पटतच नाही हे सगळं . मी चहाचे पैसे दिले आणि म्हटलं नको असे फालतू उद्योग मी पुन्हा अभ्यास करीन . तो म्हणाला राहिलं …. गरज पडली तर सांग


No comments:

Post a Comment