कधीतरी आयुष्यात .... :)


माझे तिच्यावरचे  प्रेम कृष्णाचे राधेवर होते तसे आहे
त्याला अधिकार नको....
मंगळसूत्राची सत्ता पण नको
ते अधिकार सत्ता  मिळाले तर कृष्णापेक्षा भाग्यवान असेल मी
पण हट्ट नाही कि ते हवेच म्हणून
कारण खरे प्रेम तर चंदनासारखे असते ना...
ज्याला फळे येत नाहीत तरी कृतार्थ झालेले असते 
त्याचे आयुष्य सुगंधी झालेले असते....
तशी ती  माझ्या आयुष्यात यावी
अगदी सुगंधी कुपिसारखी....
ती  दूर गेली  तरी सुगंधासारखी दरवळा वी
सोनपावलांनी लक्ष्मी घरात आली तर तिचे आनंदाने  स्वागतच होते....
तशी ती  यावी  .... मी अडवणार नाही जाताना ....
पण तिचे  येणे महत्वाचे आहे.....
कारण ती  माझ्या  कल्पनेचे वास्तव रूप आहे.....
तिच्याचसोबत तिलाच त्रयस्त ठरवून मी मोकळा झालो
तिच्यासाठी "त्रयस्त" असलेल्या  तिलाच कसे सांगू कि माझे " तुझ्यावर.. तुझ्यावर आणि ह्या सबंध जगात फक्त तुझ्यावरच मनापासून प्रेम आहे."
कधी वाटते तिला सगळे कळते.....
आणि कधी वाटते तिला कळत नाही म्हणून माझे सगळे फावते.....
असो ... कधीतरी कुठेतरी आयुष्यातल्या कातरवेळी
माझ्या छातीवर डोके ठेऊन म्हणशील.....
"कळत होते रे मला सगळे..... अगदी तुझे स्वप्न सुद्धा.....
पण शेवटी वेळ ठरलेली असते..... प्रत्येक गोष्टीची......"
आणि मी मला बिलगलेल्या  तिला अजून घट्ट कवटाळून म्हणेन
असू दे वयाच्या साठाव्या वर्षीतरी तरी तू आता फक्त ......
.......फक्त माझीच आहेस...... :)

No comments:

Post a Comment