तिची माझी तशी काही जुनी ओळख नव्हती ... ती एका खेड्यातली होती .... ओळखीची भाषा .... आमची भेट झाली ती क्रॉसवर्ड मध्ये ....पुस्तकं वाचतांना !!!
मी मराठीचं सेक्शन सोडत नव्हतो .. ती ठसक्यात बाजूला हो म्हटली पण त्या आवाजातली लय ओळखीची वाटली ... म्हणून विचारपूस केली !!!
दर शनिवार रविवार मी क्रॉसवर्ड मधेच असायचो आणि ती पण त्यामुळे परिचय हळू हळू वाढला ....!!! तिच्या भाषेची लय जरी गावरान असली तरी राहणी मात्र पुणेरी झगमगाटाला साजेशी होती
ती दिसायला कशी होती हे सांगण्यापेक्षा तिचा स्वभाव गोड होता असा मात्र सांगू शकेन ....

पुण्यात आता निदान आम्हाला चार सहा महिने झाले होते ... बर्यापैकी वातावरण कळले होते .... सगळीकडे झगमगाट दिसत होता .... पण त्या झगमगाटाला भुलण्याची तयारी नव्हती ..

एक दिवस आम्ही बारामती मेस मधून जेवण करून निघालो पत्रकार नगरकडून एक इनोव्हा गाडी वळून हॉटेलं मार्रीओटच्या दिशेने गेली ... वळण असल्याने गाडीचा वेग मंदावला ... माझी नजर सहजच गाडीत गेली ... गाडीत एक तरुणी बसलेली होती ...तोंडाला रुमाल बांधून !!! तिच्या डोळ्यांकडे लक्ष जाताच तिने मान फिरवली !!! एक अस्वस्थता त्या नजरेत जाणवून गेली ... काही कुठलीशी ओळख त्या नजरेला लपवायची तर नसेल !!!

मी चमकलोच !!! तीच ती क्रॉसवर्ड मधली तरुणी !!!
तिच्या कपड्यांचा झगमगाट ... उच्चवर्निय राहणी .... सगळ्याचा अर्थ लागला !!!!
तिने झटकन मान का फिरवली याचा अर्थ लागला .... !!!
ती तरुणी क्रॉसवर्ड मध्ये पुन्हा नजरेस नाही पडली !!!!
आम्ही समजायचे ते समजलो !!ती एक प्रतिनिधी !!!!तिच्यासारख्याच अनेक तरुणी पैस्याच्या हव्यासापायी आयुष्याची बरबादी करून घेतात !!!

पुणे शहर खूप छान !!! पण इथला झगमगाटाला जे भुलले त्यांना इथली महागाई नको ती पावले उचलण्यास भाग पडते !!!
संस्कार विसरायला भाग पाडते !!!
आपलं गावरान कल्चर लय भारी हो !!!! जपा कि राव !!!
[वरची एक काल्पनिक कथा असली तरी कुठे ना कुठे वास्तविक जीवनात असे प्रसंग आपण रोजच बघतो ... स्वताशी ... स्वताच्या आत्म्याशी .... आई वडिलांशी .....प्रतारणा करत असतो ... गती मिळालेले चक्र कुणाला थांबवता आले नाही.... पण थोड्याश्या छान शौकी आयुष्यासाठी आम्ही समाजाने अनैतिक म्हणावे असे काही करत तर नाहीना हे पाहायला हवे !!!! 




आज रविवार नेहमीप्रमाणे क्रॉसवर्डला आलो … नवीन भरपूर पुस्तके आली होती …. त्यातलं कोसलाकारांचा हिंदू चाळत बसलो ….
मी पुस्तक शेल्फ वरून घेऊन स्टूल कडे आलो … मी बसल्याबरोबर शेजारून खुर्ची वरून झटकन कुणी उठले आणि चालू लागले … मी मान वर करून त पाठमोय्रा चालत जाणार्या व्यक्तीकडे पहिले …. विदुलाच होती …होय विदुलाच ती … उगाच नसत्या प्रश्नांना उत्तरे दया यचे नाही म्हणून तर उठली नसेल …. तिने सलिल कुलकर्णीचं "लपवलेल्या काचा" विकत घेतलेलं असावं . तिच्याशी बोलायच्या उद्देशाने मी पटकन उठलो कोसला स्टूल वरच ठेवलं …. बाहेर आलो तोपर्यंत ती रस्ता क्रॉस करत होती …. मी जोरात हाक मारली पण काही उपयोग झाला नाही तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं …. मग मात्र मी हट्टाला पेटलो … मी जाऊन तिला गाठलं … डोळ्यांच्या थरथरत्या बाहुल्यांनी ती माझ्याकडे पाहू लागली त्यादिवशीचा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला … तिच्याही डोळ्यांमधली भीती तोच प्रसंग सांगत होता … पण मी मात्र जणू काही माहीतच नाही अशी भूमिका घेतलि…. काय माहित तोंडाला रुमाल बांधला असल्याने दुसरी कुणी असू शकेल असा भासवण्याचा माझा प्रयत्न होता … तिला लाजिरवाणे वाटू नये म्हणून मी जणू अनभिज्ञ आहे असे दाखवण्याचा माझा प्रयत्न होता
पण तिने तो पहिल्या फटक्यात उडवून लावला …"त्या दिवशी मला गाडीत बघितल्यावर तुझ्या डोक्यात वेगवेगळे विचार आले असतील ना ?? मला वाटलं त्या दिवशीनंतर ओळख नाकारतो कि काय !!! ज्या देशात गरीब म्हणून जन्माला येणं हाच मुळात गुन्हा आहे तिथे माझ्यासारख्या गरीब घरातील मुलीनी चांगलं आयुष्य जगण्यासाठी थोडीशी किंमत मोजली तर बिघडलं कुठ ????"
मी काही न बोलत तीच सगळं सांगत होती …. मग मी पण काही माहीतच नसल्याचा आव आणणं सोडून दिल … आणि म्हणालो कुणी सांगितलं "गरिबी शाप आहे म्हणून ??? परिस्थिती शी दोन हात करून कष्टाने पुढं आलेले कितीतरी उदाहरणं आहेत …। " यावर माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून म्हटली …। "तुला काय माहिती आहे रे परिस्थिती ??? आई वडील दोन्ही नोकरी करतात …कुठल्या गोष्टीसाठी तुला तडजोड करावी लागली ??? सगळा आयत मिळालं … मिळतंय … मग काय बोलायला जातंय तुला …म्हने परिस्थिती ….!!!"
मी म्हटलं " चिडू नको … पण पैसे कमावण्यासाठी असला घाणेरडा मार्ग …. !!! " तिच्याशी बोलण्याची मला हिम्मत होत नव्हती …. माझ्या तुटक शब्दावरून तिने ताडलं असावं ….
डोळ्यात पाणी आणून मोठ्या जिकिरीने म्हणाली … "मग काय करायला हवं होतं ?? परिस्थितीशी दोन हात करता करता हतबुद्ध झालेल्या माझ्याजवळ दुसरा कुठला मार्ग होता ???? इथं जगायचं म्हणजे हर घटकात पैसा लागतो ….:
"माणसांनी गरज मर्यादित केल्या तर बरोबर पुरतो " माझ्यातला मार्क्स जागा झाला …
यावर ती फक्त कुत्सित हसली …. माझ्यातला जागा झालेला मार्क्स … गप्प गार झाला ...
"आपण बसून बोलूया का ??"…. याला तिने होकारार्थी मान हलवली … मग आम्ही PMT च्या बस स्टौप कडे बसलो … एवढी हुशार …संस्कारी मुलगी … अश्या वाममार्गाला कशी लागली हे मला जाणून घ्यावेसे वाटले …. आणि तिला पण मनमोकळे सांगावे वाटले  


3


घरची खूप गरिबी नसली तरी बगायातदारा इतकी श्रीमंती पण नव्हती ...दहा एकर शेती कोरडवाहू !!! पन सुखी होतो … आमच्या शिक्षणाचा खर्च करू शकतील इतकी आबादी होती आमच्या घरात !!! मी मोठी लहान दोन भावंडे त्यांचे डोके शेतीत चालायचे मी अभ्यासात हुशार … मी शाळेत पहिल्यापासून पहिल्या पाच मधली विद्यार्थिनी … शाळेत माझ्या वर्गात पहिला नंबर वाण्याच्या मुलाचा असायचा माझा दुसरा कधी तिसरा …. दहावीला ७५ टक्के मार्क्स मिळाले मग जिल्ह्याचा शाळेत पाठवल तिथे मला टेक्निकल CET मध्ये १४६ मार्क्स मिळाले पुण्यातल्या नामवंत इंजिनीरिंग कॉलेजला अडमिशन मिळाले … आमच्या घरातली शिक्षणासाठी पुण्यात जाणारी मी पहिलीच !!!! कुणाची ओळख नाही …. काही माहिती नाही …. अडमिशन तर घेतले कोलेजच्या होस्टेलची फी अव्वाच्या सव्वा … बरं नात्यातला पण कुणी पुण्यात नाही …. आम्ही आमच्या गावातल्या मानलेल्या मावशींच्या भावाकडे थांबलो … त्यांनी पुण्यात कॉलेज जवळ चौकशी केली … ४ मुली राहत असलेल्या १ बी एच के मध्ये मला जागा मिळाली …. खूप हायसे वाटले …. मेस वगैरे मग रूम मधल्या मुलींच्या ओळखीने झालं !!! त्या तिसर्या वर्ष्याच्या आणि मी पहिल्या वर्षाची …. !!!
वडील मला सोडून निघून गेले …. हातावर ४००० रुपये ठेवले… एवढी मोठी रक्कम पहिल्यांदाच मी बाळगत होते … म्हटला एवढे कश्याला … मेस आणि रूमचे तर भरले आहेत ….ते म्हणाले असू दे जवळ गरजेला वापर जास्त उधळपट्टी करू नकोस …. बाकीच्या मुली कोण फोनवर कोण आमच्याकडे बघत … माझ कुणाकडेच लक्ष्य नव्हत !!!
मुलींनी "इंट्रो" घेतला माझा त्या दिवशी …. मला थोडेसे वेगळे वाटले पण रागिंग प्रकाराबद्दल ऐकून होते आणि मानसिक तयारी पण करून होते …. त्यामुळे त्रास वगैरे झाला नाही … माझा स्वभाव मनमिळावू असल्याने मी लवकरच रूम मध्ये adjust झाले !!!
अजून तरी सगळी शांतता शांतता होती …
रूम मेट मला बर्याचदा बाहेर फिरायला सोबत घेऊन जात असत …मी कशालाच नाही म्हनायचे नाही म्हणून कुणाला काही आणायचे असल्यास मी नेहमी जोडीदार असायची !!!
कुणाला दीदी … कुणाला ताई …मस्त गट्टी जमली !!!
मी नेहमीच्या सवयी प्रमाणे पहाटे उठून अभ्यास करायचे …. बाकीच्यांची झोपमोड होत असे … मग मी किचन मध्ये अभ्यास करत असे …. अस तसं सेमिस्टर संपलं … सबमिशनला "सगळे म्हणायचे" तसा त्रास झाला नाही … सगळ रेगुलर होत….
मी बाकीच्यांचे लिहू लागले …. तो आठवडा आमची रूम म्हणजे रूम कमी आणि काचारापेतीच जास्त वाटू लागली ….
मी सुट्टी लागल्या लागल्या शिवाजीनगर आणि पहिला घराचा रस्ता धरला … पायात पुण्यात आली तेव्हा paregon ची पांढरी चप्पल होती … पण बाकीच्या मुली सारख्या माझ्या पायाकडे बघू लागल्या … हसू लागल्या …. कोलेजला आली कि … toiletला आली अस खोचकपणे विचारू लागली … मी रडूबाई अगदीच नव्हते … तडक जाऊन sandal घेऊन आले ….
इतरांपेक्षा वेगळा राहिल कि हसू होतं याचा अनुभव घेतला !!!!

3 comments: