क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 8

आमची प्रक्टिकल शेवटची असल्याने आमच्या क्लास मध्ये शर्मा वगैरे आडनावाची उत्तर भारतीय विद्यार्थी पण होते ….  मंदार त्यांना भैट्या  म्हणूनच हाक मारायचा …. ते पण बिचारे खूप दुरून शिक्षणासाठी आलेले असल्याने चकार शब्द पण काढायचे नाही …
आमच्या मुलींची मात्र त्यांच्याशी असलेली मैत्री सगळ्याच खटकायची ….
मी मात्र कुठल्याच मुलाशी मैत्री वगैरे करण्याच्या फंदात पडली नाही … आपलं प्रक्टिकल आणि आपण … एक दिवस अमित शर्मा माझ्या शेजारच्या कॉम्पुटर समोर बसला … मला  " हाई " केलं … माझ्या अंगात पुन्हा थंड पाणी ओतावं तसं झालं … मी पण खूप त्रासिकतेणे हाय म्हटलं …. नंतर शांतता …
हळू हळू मला मुलांची … त्यांच्यात उठबस करण्याची सवय झाली … अधी असलेला बुजरेपणा मिटत चालला होता …  माझ्या नोट्स पण हळू हळू विख्यात व्हायला लागल्या …  अमित आणि मी चांगले मित्र झालो …. हाय पासून झालेली सुरुवात टाळी देण्यापर्यंत आली होती …
एक दिवस मंदार माझ्याकडे आला आणि मला हे यु पी वाले कसे गैर फायदा घेतात मुलींचा … मागे पुढे काय बोलतात …. खूप समजावून सांगू लागला …. जशी काही मी अमितच्या प्रेमात पडले होते असं सांगू लागला …. उल्लेख मात्र असाच "  भैटे "… आधीच बुजरी त्यात मंदार असं समजावून सांगून गेला …. मला पुन्हा मुलांकडे पहायची हिम्मत पण होईना …. पण अमित ने वेळो वेळी खूप मदत केली। माझ्यातला बुजरेपणा घालवला  …. मी चांगली रुळले …अमित म्हणायचा "मित्रता  करने  में  धीमे  रहिये , पर  जब  कर  लीजिये  तो उसे मजबूती से  निभाइए  और  उसपर स्थिर रहिये ." त्यांनी माझा विश्वास जिंकला होता ….  प्रेमी म्हणून नाही सच्चा मित्र म्हणून …। मंदार मात्र खूप रागाने माझ्याकडे बघायचा …. नंतर मी विचार करायचंच सोडून दिलं …. यार कोण हा … मी कुणाशी बोलावं … नाही बोलावं … हे यानी का ठरवावं ….
माझ्या मनाला माहित होतं ना कि अमित आणि मी  फ्रेंड्स आहोत मग बस….
या सेमिस्टर ला आपल्याला कुणी लाईक करावं … वगैरे गोष्टी मनात आल्या पण नाही …. गरज पण वाटली नाही …. निखळ मैत्री काय असते हे अमित शर्माने मला शिकवलं …
आयुष्याच्या या वळणावर पण मला मित्र म्हणून अमित आठवतो … आजही …

No comments:

Post a Comment