क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 14

खरं तर वडिलांनी आम्हाला म्हणजे मला शिकवायलाच नको होतं . कारण शिकल्यामुळे आमची स्वतंत्र मते आणि त्यांचं अस्तित्व याची मला जाणीव झाली . मी घरी आल्यावर मात्र बाबांनी असं करायला नको होतं असं आईजवळ बोलले . क्लास कुठल्या नजरे बघत असेल माझ्याकडे . शी , कल्पनाच करवत नव्हती . जन्मदात्या बापाने रात्री कुठं होती असा प्रश्न विचारला तेव्हा जग किती प्रश्न उपस्थित करेल . मी कमावलेल्या इज्जतीचा क्षणात कचरा झाला होता . स्वताची घाण येऊ लागली . वडिलांचा दोष होता का ? कि परिस्थितीचा दोष होता !!! कि माझ्या दुर्दैवाचा !!! स्त्रीचं जगणं इतकं अगतिक असतं याची स्त्री असूनही पहिल्यांदाच जाणीव होत होती . संशयाचा उधई नात्याच्या वृक्षाला पोखरून काढते . मी आणि बाबा समोरासमोर येणं टाळत होतो . त्यांना वाटत होतं मी विश्वासघात केला म्हणून आणि मी जळत होते माझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून . दोघेही दोन टोकांवर होतो .
माझ्या फोनवर कॉल आला तरी तिरप्या नजरेने बघत असत . आणि हे असह्य होत होतं . अतिशय नाजूक प्रसंग माझ्या वडिलांनीच खूप चुकीच्या पद्धतीने हाताळला होता . मला नम्रता अमृता आठवत होत्या . सगळा काही अनैतिक म्हणावं असं करूनही त्यांच्या घरच्यांच्या नजरेत किती सालस होत्या आणि मी इतकं सगळं जपूनही इतके लांचानास्पद आरोप आणि वडिलांची संशयाची नजर मला पोखरून काढत होत्या .
जगात सत्य वागून उपयोग नसतो सत्याचा देखावाही तितकाच महत्वाचा असतो . आणि हा देखावा उभा करण्यात जो किवा जी यशस्वी होते ती सज्जन्तेचे प्रमाणपत्र समाजाकडून मिळवते . अश्या प्रमाणपत्रांची गरज समाजात वावरताना आजच्या युगातही लागते याचं खूप आश्चर्य वाटतं . आपल्या आईवडिलांनी जग बघितलं नाही म्हणून आपल्यावर अशी वेळ आली .
यात काही अंशी मी पण दोषी आहे असं वाटून गेलं . नम्रता आणि अमृता यांचे किस्से मी एका सुट्टीत घरी सांगितले आणि आपली पोरगी पण असेच काही बाही करत असेल याच्या संशयाच्या व्याधीने बाबांना घेरले .
असो .  आठ दिवस मी घरीच होते . क्लास टीचर चा कॉल वडिलांच्या मोबाईल वर येउन गेला .
आणि दुखांचे ढग हळू हळू विरु लागले . वडिलांचा गैरसमज दूर करावा म्हणून मी आईला गळ घातली . ती सविताशी बोलली आणि खात्री करून घेतली कि मी तिच्याच घरी होते . मग वडिलांना खूप वाईट वाटले . मी शेतात घास कापायला गेले असताना ते पण विळा घेऊन आले आणि झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागू लागले . आपले वडील आपल्याशी माफी मागताय कुणाला आवडणार !!! मी त्यांच्या गळ्यात पडून ढसढसा रडले आणि पुन्हा असं  नाही न करणार असे  वचन घेतले .






No comments:

Post a Comment