क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 5




कॉलेजच्या कोरीडोर मधून जाताना मी आता काळजी घेऊ लागले …. नोटीस बोर्डची काच दिसली कि उगाच काही वाचण्याच्या बहाण्याने उभे राहून केस नीटनेटके करू लागले …. ते आठ दिवस अगदी भारावून गेले …. जणू कॉलेजमधल्या नजरा माझ्यावरच  खिळल्या आहेत असं वाटत होत.
वेद माझ्याकडे बघत होता कि नाही हे बघण्यासाठी त्याच्या डोळ्यांत बघण्याची हिम्मत होत नव्हती ….
 पण मी मोठी शहाणी होती …
तो दिसलाकि मी चेहऱ्यावरचे भाव अगदीच त्रासिक करून टाकत असे …. जणू काही त्याला वाटावे आपल्या बघण्याचा तिला त्रास होतो …. मला असल्या गोष्टी आवडत नाहीत …. पण केसांची बट मात्र सावरायला चुकायची नाही …
  बिचारा माझ्याकडे पाहत होता कि नव्हता …. त्याच्या मनात काय फिलिंग्स होत्या …. याचे सगळे assumptions  मी मनानेच करत होते  आणि तो असाच विचार करत असेल अस समजून मी वागत होते …. त्याच्या फक्त  योग्य वेळी वापरलेल्या दोन शब्दांमुळे माझी अशी गत झाली होती .....मी एका अज्ञात विश्वात पोहोचले होते …. रूम मधून निघताना दहा वेळा आपण कसे दिसतो हे बघून निघू लागले …
"लुक" ची काळजी घेऊ लागले

हि भारावलेली अवस्था आठवडाभर टिकली … नंतर पुन्हा जमिनीवर …. तो तेवढेच बोलून गेला नंतर ना मी बोलण्याचा प्रयत्न केला ना तो माझ्याकडे बोलायला आला … माझा उत्साह अचानक मालवला ….

 चूटपुट लागून राहिली कि तो कधी माझ्याशी बोलतो …. पण नालायक आलाच नाही …. माझं उसनं आणलेलं  Attitude आपोआप गायब झालं ….

सेकंड सेमचं सबमिशन चालू झालं … या वेळीही माझं  सबमिशन वेळेत आटोपलं … घरी जाण्याची घाई चालू झाली … HOD आणि प्रिन्सीची सही घेऊन निघणारच होते तर वेद फाईल्स घेऊन तिथे उभा राहिला … बहुतेक त्याला सरांनी खूप पळवला असावा …
मी फाईल्स छातीशी गच्च धरून उभी होते …
तो हसला आणि म्हणाला  "hii  "
मीही हसून दाद दिली …
तो म्हणाला आता घरी का ?
मी "हो , दुपारी निघाले तर संध्याकाळपर्यंत पोहोचेल … "
तो " अच्छा , पण  घरी अभ्यास होतो का ??"
मी "हो , होतो ना  उलट इथल्यापेक्षा छान होतो "
प्रिन्सी च्या केबिन मधली बेल वाजली आणि आम्ही निरोप घेतला ….
मी घरी आले खरी पण अभ्यास काही होईना … त्याची आठवण येत होती असेही नव्हतं पण काय माहित घरी थांबण्याचं मन करीना
पायांना सारखा घाम यायचा …
दोन तीन दिवस गेले … पण अभ्यास काही झालाच नाही नीट । मग म्हटलं इथ काही खरं  नाही
रूमवर जाते  म्हणजे बाकीच्या मुली अभ्यास करतांना पाहून तरी टेन्शन येईल … आणि माझा अभ्यास होईल असा अंदाज बांधला …
आईला सांगितलं ती म्हणे तुझा अभ्यास होत नाही मग उगाच नको थांबू इकडे … लगेच पुण्याला निघ …
मी अजून दोन दिवस थांबले आणि पुण्याचा रस्ता धरला ….
रूमवर  BAG ठेवली आणि होस्टेल वरच्या मुलींकडे गेली …. तिथे माझ्या क्लास मधील बर्याच मुली राहत होत्या … मग प्रत्येक मुलगी तिचा SYLLABUS किती कम्प्लीट झाला हे सांगू लागली । कुणाची कितवी रिविजन चालू आहे हे सांगू लागल्या  … मला आधीच टेन्शन आलं होतं … त्यात तिथ क्षणभर थांबू वाटेना ….
मी घामाघूम झाले … आणि आता आपण खूप मागे पडलो असं वाटलं …
रूमवर आले ते तोंड एवढसं करून …
अमृता आली तीने बघितलं मला … केव्हा आलीस असं विचारलं …  मला समजलच नाही … किवा उत्तर द्यावासच वाटलं  नाही … काहीतरी निरर्थक गोष्टींना मी अतिरिक्त महत्व दिलं म्हणून आता मागे पडणार असं दिसू लागलं ….
नम्रता आली मग दोघींनी मिळून विचारलं …
मी रडत रडत सांगितलं … मुलींचा इतका अभ्यास झाला आणि मी इतकी मागे पडलेय ….
माझा मेक्यानिक्स आणि एम २  अजून हातात घायचा आहे … ग्राफिक्स सरांनी शिकवलंय त्याच्या पुढे काहीच केला नाहीये …. काय करू काही सुचत नाहीये
यावर दोघींनी मला बाहेर फिरायला येण्यास संगीतला … आम्ही शंकराच्या देवळात निघालो …
रस्त्यात त्यांनी मला खूप महत्वाचा मूलमंत्र दिला …. मला म्हणे "बाई  आपल्याला पी एल लागून किती दिवस झाले ??"
मी म्हटला" ६ दिवस …"
" मग सहा दिवसात २ इंगीनिरिंगचे विषय संपवणं कसं शक्य आहे ??" MECHANICS ला अगदी  बियर जोन्सन आणून बसवला तरी इम्पोसिबल  आहे …
माझ्या डोक्यात प्रकाश पडला ....माझी चूक कळली  ....मुलींचा खोटारडेपणा लक्षात आला ….
लोक उगाच घाबरवून देतात …  मी अभ्यास  पुन्हा जोमाने सुरु केला ….
पण इंगीनिरिंगच्या अभ्यासाचं एक नवं वैशिष्ट समजलं  ते म्हणजे आपण आपली हृदयस्त आवड पण अभ्यासाच्या नादात विसरून  जातो  !!!  पूर्ण पी एल संपेपर्यंत मला   एकदाही वेदची आठवण झाली नाही …


No comments:

Post a Comment