क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 9

सेकंड ईयर ला आम्ही डीपार्टमेन्ट मध्ये आलो . पहिल्या वर्षाला सगळे कॉमन होते. आमची प्रत्येकाची धडपड बेसिक्स समजून घेण्याची असायची.  माझा प्रोग्रामिंग वर चांगला हात बसला होता. अमितने मायक्रोप्रोसे सर चे प्रोग्राम पण खूप सोपे करून सांगितले. मज्जा आली . आमची कुणाचा प्रोग्राम आधी होतो अशी धडपड चालू लागली. मंदार मात्र यापैकी कुठल्याच गावात नव्हता . तो ल्याब मध्ये पण नुसता टाईमपास करायचा. रोज बोलाने खायचा . म्याडमचा दिवस  तर मंदारची खरडपट्टी काढल्याशिवाय जायचा नाही. मी न राहवून त्याला समजुतीच्या चार गोष्टी सांगायला गेले तर मलाच अक्कल शिकवायला लागला. मग म्हटलं ,,,, भाऊ । तू आणी तुझ नशीब ….
पण कसा काय माहित एकही प्रोग्राम येत नसून त्याने फायनल मध्ये खूप अवघड प्रोग्राम एक्जिक्युट करून दाखवला … आम्ही तर हक्का बक्का झालोच पण म्याडम सुधा हक्काबक्का झाल्या. भाऊ छोटी गोल सीडी घेऊन आला होता. मला म्हणे विदुला …. माणसाची हुशारी तो किती आहे यापेक्षा तो कशी दाखवतो यात आहे …. मी म्हटल "बरोबर आहे !" . पण आज कळतंय किती चुकीचा होता तो … घडण्यापेक्षा आणी घडवण्यापेक्षा त्याला दाखवण्यात जास्त रस होता आणी हे खूपच घातक होतं
पण तेव्हापासून त्याचं सगळंच सूत्र बदलत गेलं. तो पहिला प्रोग्राम त्याने फसवणुकीने रण केला पण त्याची गाडी विरुद्ध दिशेला रण होतेय … हे  त्याच्या लक्षात आलं नाही किंबहुना त्याला सांगणार कुणी नव्हतं .
मी मात्र स्वतः प्रोग्राम केला थोडा चुकला …. पण प्रयत्न केला होता … शिक्षकांना तो भावला असावा …। मला ५० पैकी ४४ मार्क्स होते आणी मंदारने पूर्ण प्रोग्राम करून त्याला ३३  मार्क्स होते …. कारण म्याडम च्या पण लक्षात आलं होतं.
मंदार वाट चुकत होता. मला अमित आणी इतर कुणावरून समजावून सांगणे पण त्याने बंद केलं होतं.
सेकंड यीअरलाच रोहन जगताप नावाच्या अत्यंत हुशार मुलाशी माझी ओळख झाली होती. रोहन नावाने माझ्या आयुष्यात भयंकर वादळ आणलं.

No comments:

Post a Comment