क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 19

 एकदिवस किशोर सोबत फोनवर बोलत होते , अचानक शेजारच्या रूम मधून जोराचा आवाज आला रडण्याचा . रुबिना रडत होती , ओरडत होती मुझे नाही जीना , मुझे मरना है , मेरी जिंदगी खराब हो गई... 

मला रुबिना पहिल्यापासून नाटकी वाटायची , फर्स्ट इअर ला होती पण खूप खोटं बोलायची . किशोरला कल्पना दिली आणि फोन ठेवला ...पण मुझे मरना है वगैरे बोलायला लागली मग आम्ही धावत गेलो सगळ्या.

तिच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसत होते, असं वाटून गेलं खरंच हिने आत्महत्या केली तर ...

मी लगेच जगतापला फोन लावला , त्याचे वडील श्रीकांत जगतात पुण्यातील प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ होते . त्यांची अपॉइंटमेंट कधी घ्यावी लागेल वगैरे विचारले तोच तो म्हणाला थांब मी येतो गाडी घेऊन आपण डायरेकटली हॉस्पिटलमध्ये जाऊ. मी म्हटलं एवढं काही नाही उद्या आला तरी चालेल .मला खरं तर  रुबिनाचे नाटकं वाटत होती पण आज काहीतरी वेगळं घडलं होतं. आम्ही तिला खूप खोदून खोदून विचारलं पण ती काही बोलायलाच तयार नव्हती.

मी तिच्या घरी फोन केला पण कुणी उचलला नाही .

आम्ही सगळी रात्र तिच्यासोबत जागून काढली. 

दुसऱ्या दिवशी आम्ही जगतापच्या गाडीत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. रुबिना यायलाच तयार नव्हती, आम्हाला बोचकायला बघायची पण कसातरी करून तिला आम्ही तयात केलं . तोपर्यंत तिच्या घरी फोन झाला , वडील लगोलग निघाले . तिला आधी पण हा त्रास झाला होता असं त्यांच्याकडून कळलं . किशोरला सगळं सांगितलं तो पण आला हॉस्पिटलमध्ये. 

मी पहिल्यांदाच मानसोपचार केंद्र बघत होते . हॉस्पिटल कमालीचे फ्रेश वाटत होतं . अगदी एखाद्या हॉटेल मध्ये जावं तसं. 

वॉश रूम विचित्र होती आतून कडी नव्हती बाहेर एक महिला होती तीच बाहेरून कडी लावायची आणि आपण आवाज दिला की उघडायची. बहूदा मानसिक रुग्णांचा विचार करून उपाय योजना केली असावी सगळीकडे सेन्टरलीझ ac होता , पंखाकुठंही नव्हता , मला वाटून गेलं एखाद्याने आत्महत्या करू नये म्हणून तर नसेल ना ही उपाययोजना ? 






No comments:

Post a Comment