क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 16

  मी डिस्टर्ब् होते . अभ्यासात लक्ष लागत नव्हते . मात्र दिवसामागून दिवस गेले  तशी परिस्थिती थोडी सुधारली . रोज फोनवर बोलून बोलून मीही थोडी किशोर मध्ये गुंतायला लागली होती . किशोर बाकीच्या पण परीक्षा देत होता .   होणारा  नवरा म्हणून मी त्याला बघू लागले होते . अधून मधून तो पुण्याला यायचा . मग आम्ही मंदारची बाईक घेऊन मस्त भटकायचो . छान वाटत होतं . त्यामानाने   किशोर खूपच लाजाळू होता . माझा हात हातात घेतांना पण तो खूपदा कचरायचा .  मुद्दाम त्याच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायची . मग तो अजून बाजूबाजूला सरकायचा . मी मोठ्याने हसायची . त्याची मस्करी करायची .   हळू हळू त्याला पण सवय झाली. 

पुण्याच्या वेताळ टेकडीवर आमचा अड्डा होता . किशोर पुण्याला आला की निखिल च्या रूमवर तो राहायचा . माझ्या वर्गातले सगळे त्याला जिज्जू म्हणायचे .

सबमिशन  उरकले . पीएल चालू झाल्या

परीक्षेचे दिवस जवळ आले . उन्हाळी परीक्षेचे  दिवस होते . मी घरी जाण्याऐवजी रूमवर राहणे पसंद केले . थर्ड ईअर ची लास्ट सेम होती . इथे बॅक लागणे म्हणजे फायनल ईअर ला पुन्हा स्कोअर करण्यासाठी अडचण अली असती .  मग मी किशोरला परिस्थिती सांगितली . तोही तयार झाला . अडीच महिने आता आम्ही एकमेकांना भेटणार नव्हतो . 

फोन मात्र रोज होत असायचे. माझा अभ्यास पण चांगला चालू झाला .  किशोर येणार नाही म्हणून हुरहूर लागली होती खरी . पण आत्ता कष्ट घेतले तर चांगले दिवस बघू शकू आपल्या भावंडाना मदत करू शकू म्हणून पुन्हा जिद्द धरली होती . किशोर तलाठ्याची परीक्षा पास झाला . सर्वानी माझ्याकडून वाडेश्वर ला पार्टी घेतली . अर्थात किशोर नेच  पैसे पाठवले होते . देव करतो ते चांगल्यासाठी करतो . किशोरशी लग्नाला नकार ते त्याच्या प्रेमात आकंठ बुडणे हा एका रात्रीतला प्रवास नव्हता . 



No comments:

Post a Comment