क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 6

परीक्षा संपली !!! आता मिनिटभर पुण्यात थांबायचं नव्हतं !!! पण पेपर सुटला तेव्हा साडेपाच वाजले होते …. मग रूमवर येउन धिंगाणा करावा म्हटलं पण बाकीच्यांचे पेपर बाकी होते । मग त्या दिवशी आमचा मुक्काम होस्टेलवर !!!! फुल टू धमाल !!! चार वेळा रेक्टर वरती येउन दम देऊन गेली …. पण !!!!

सुट्टी मजेत गेली

घरी मागे लागून नवीन मोबाईल घेतला होता . परत पुण्यात आल्यावर रोज रोज घरी फोन करावा वाटत असे
मग आई ओरडायची . मी बावळट सारखं गावभर फोन नंबर देऊन ठेवला होता … रात्री अपरात्री कुणीपण मेसेज करायचं मी तेवढ्या रात्री करायची म्हणजे करायची !!! 
एक दिवस वेद प्रणाली सोबत फिरताना दिसला … प्रणाली म्हणजे सेकंड इयर इटीसी !! शरीराच्या आत कुणी थंड पाणी ओतावे तसे झाले …नंतर कळले त्यांचं अफ़ेअर  खूप दिवसंपासुंच आहे … मग हा मला का सजेशन देऊन गेला … 
वाईट वाटलं … खूप !!! 
पण वाईट वाटल तसं मागे गेले । अरे राम !!  तो आपल्याशी एकाच वाक्य बोलला आणि आपण केव्हडा राई चा पर्वत केला होता . त्या दिवसाआधी आपण वेद नावाच्या माणसाला कधी पाहिलं तरी होतं का !!! अचानक या फिलिंग्स आल्या कश्या …. स्वताबद्दल हसू येत होतं !!!! 
स्वाभाविकपणे माझ्या तोंडातून शब्द निघून गेला Infatuation !!!
ती म्हणाली खरय Infatuationच   होतं ते 
 …. त्यातल्या त्यात बरं झालं मला काय वाटतंय ते कोणाला सांगितलं नव्हतं नाहीतर फार मोठा पोपट झाला असता . कधी कधी देवही माणसाला वागण्याची सद्बुद्धि देतो असं उगाच वाटून गेलं
रूमवरच्या मुली त्यांच्या बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारत. आम्ही मात्र  पुन्हा एकदा आदर्श व्रताचरणाला !!!
 माझ्या  वाढदिवसाला रूममधल्या मुलीनी खूप छान ड्रेस घेऊन दिला. वर नम्रताची  अनावश्यक कमेंट …. ड्रेसिंग सेन्स सुधार या वेळेस आमच्या पसंतीचा घेऊन बघ !!! मग त्यांनी घेऊन दिला पंजाबीच पण चुडीदार !!!! … चुडीदार पहिल्यांदाच घेतला होता !!! काळ्या रंगाचा ड्रेस माझ्या गोर्या रंगाला खुलून दिसत होता !!
मुलीनी जाता जाता माझ्यात Evaluation  घडवून आणण्याचा प्रयत्न केला 
मग मात्र मी दोन तीन ड्रेस घेतले  पण नम्रताला घेऊनच !!! किती वाईट विचार करत होते  यार यांच्याबद्दल !! त्या बॉयफ्रेंड सोबत रात्र काढतात म्हणून यांना वाईट म्हणू  का ?? त्या त्यांच्या खाजगी जीवनात कश्याही असल्या तरी मला मात्र लहान म्हणून जीव लावला होता !!! अनोळखी शहरात माझा पालकत्व घेऊन त्यांनी मला जगात वागण्याचं शिकवलं होतं !!! त्यांनी जाऊच नये असं वाटत होतं !!!  पण त्या प्रोजेक्ट एक्स्टेंड झाला म्हणून काही दिवस थांबल्या होत्या. आमचा रेगुलर कॉलेज चालू झालं त्यांचा प्रोजेक्ट पण संपला … मला दुसरी रूम शोधावी लागणार होती किवा नवीन रूम पार्टनर शोधाव्या लागणार होत्या … जातांना मध्ये खूप छान आणि भरभरून लिहून गेल्या …. पण त्यापेक्षा मनावर खूप काही कोरून गेल्या

No comments:

Post a Comment