क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 4


रूम मध्ये मुलांचाही वावर होता हि गोष्ट मला पी एल मध्ये कळली … नम्रताचा बॉय फ्रेंड माझ्या बेडवर ल्यापी घेऊन बसला होता मी चोरून चोरून रुममध्ये अले… खूप लाज वाटत होती … uncomfortable वाटत होते … मी मधल्या रुममध्ये जी जाऊन बसली ती जेवण करायलाच उठली … हातपाय धुण्यासाठीसुधा बाथरूममध्ये जावेसे वाटेना …. काय म्हणे फायनलच प्रोजेक्ट सबमिशन बाकी होते … एक दिवस तर रात्री १० वाजेपर्यंत स्वारी माझ्या बेडवर बसून होती … मला माझ्याच रुममध्ये चोरासारखे वाटत होते … नंतर मात्र याचीही सवय झाली …. एक दिवस नम्रता सकाळी ६ ला रूमवर आली … रात्रभर ती त्याच्या रूमवर होती … त्याच्या १ BHKमध्ये राहणान्रे ४ मित्र बाहेर हौल मध्ये झोपले होते …. हे मला नंतर अमृताकडून कळले … मी तिला आपला बाळबोध प्रश्न केला …" ती त्याच्याशी लग्न करणार आहे का ??" … यावर ती जोरजोरात हसू लागली …. मी मात्र हे काय बघतोय आपण असा बावळट चेहरा करून तिच्याकडे बघत होते … मी म्हटले "हसतेस का ???" यावर ती म्हणे "अगं बाई लग्न ही फार वेगळी गोष्ट आहे …." मी म्हटला "ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात तर लग्न का नाही करू शकत ???"यावर ती डोळे मोठे करून म्हणाली "जात आडवी येते जात !!!!" मी म्हटलं "मग तिच्या होणार्या नवर्याला कळले तर ??"कसं कळणार ?? टोर्च घेऊन हनिमूनला जाणाऱ्या स्त्रीरोग तज्ञाशी (gynecologist )लग्न नाही करायचे म्हणजे झालं !!!तिच हे वाक्य किती स्फोटक होता हे मला अक्खी रूम हातपाय आपटत हसत होती हे बघून पण कळल नाही !!!!सुरुची म्हणाली "जाऊ दे ग … बच्ची आहे अजून … "यावर मात्र मी थोडी घाबरले … झाला सगळा प्रकार लगेच आईला सांगितला …. रूम सोडण्याचा विचार करू लागले … पण लगेच दुसरी रूम मिळणार नव्हती आणि नम्रताही फायनलची परीक्षा झाली कि रूम सोडून जाणार होती म्हणून मी थांबायच ठरवलं !!!परीक्षा झाली Applied चा पेपर सोडला तर बाकीचे पेपर छान गेले …. सेकंड सेमिस्टर चालू झाले …. ग्यादरिंग होणार होता फेब मध्ये …. १ १ ते १ ४ फेब … मला डान्स चांगला जमायचा मग मी डान्स मध्ये भाग घेतला होता … सोलो डान्स !!! मग duet केले सुगंधासोबत !!! duetला बक्षीस मिळालं मज्जा आली … मग आम्हाला १ ४ च्या शेवटच्या दिवशीच्या प्रोग्राममध्ये पाहुण्यांसमोर डान्स करण्याची संधी देण्यात आली !!!


१ ४ फेबला mechanical च्या अनिरुद्ध ने सुगंधाला प्रपोज केले … तिने आधी भाव खात … नंतर एक्सेप्ट केले … पण तेव्हा मात्र माझ्या मनाला कुठतरी खंत वाटू लागली …. मला का नाही कुणी प्रपोज केला !!! मी मनाला समजवायचे कि बर झालं नाही केल तेच ...… आपण यासाठी नाही आलोय कॉलेजमध्ये …


पण शेवटी मी पण माणूसच ना रे !!! आपल्याला नाही का दिल सौंदर्य देवाने असा प्रश्न मनाला विचारू लागले !!!! का माहित नाही पण उगाच फ्याशनेबल रहावेसे वाटू लागले … मग मी रुममध्ये अमृता नम्रता वगैरे नसताना त्यांचे जीन्स … कर्डीगण ..tube tops ... harem pants वागिरे ज्यांची नावे सुधा माहिती नव्हती ती या मुलींची try करून बघितली … । एक दिवस मी पण जरा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आले … सगळे माझ्याकडे बघत चेंज होतोय अश्या नजरेने बघू लागल्या …. ….दुसऱ्या दिवशी पोपटी रंगाचा पंजाबी भडक अगदी घालून कॉलेज मध्ये गेली ....थोडाफार चेंज लक्ष्यात येत नाही पण एवढा मोठा चेंज सगळे बघू लागले …मल अजून ओशाळल्यासारखे झाले … पण कसाबसा दिवस काढला … कॉलेज सुटल्यावर घरी जाताना "तो " मागून बाईक वर आला … आणि माझ्या पुढे बाईक उभी करून हेल्मेट काढले … वेद !! मला थांबवून तो म्हणाला … सध्या कपड्यातच छान दिसतेस …. बाणासारखे वाक्य पुरे करून जसा आला तसा वेगाने निघून गेला … शब्द हवेत विरले तसं माझं अंग अंग मोहरला …. कुणीतरी माझ्याकडेही बघत होता हि जाणीव !!! बावळट गबाळे लोक हि कुणाच्या पसंतीला उतरू शकतात तर !!! माझ्या चेहऱ्यावरचे हास्य लपवता लपत नव्हते !!! सगळे विचारायचे पण हि गोष्ट मी सगळ्यांपासून लपवून ठेवली !!!

No comments:

Post a Comment