क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 11

सेकंड इयर संपता संपता आमच्या क्लास मध्ये आमचे ग्रुप पडले . मी मंदारच्या ग्रुप मध्ये ओढली गेले . हो इच्छा नसतांना . तसा तो फार वाईट नव्हता . फक्त कधी कधी का माहित नाही पण माझ्याबद्दल पझेसिव वाटायचा .  आणि नेमकं तिथेच मला खटकायचं . मी प्रोग्रामिंग शिकण्यासाठी कॉलेज मधलेच  जन्मेजय नावाचे सर त्यांच्याकडे क्लास लावला . आम्हाला शिकवणारे सरांचं मला समजत नव्हतं . विशाखा आणि सविताने पण त्यांच्याकडे क्लास लावला होता . प्रणाली पण होती . त्यांना इटीसी मध्ये पण प्रोग्रामिंग सब्जेक्ट होता . त्यांना खरं तर जन्मेजय सर होते शिकवायला पण तिला क्लास मध्ये बहुदा चाटिंग मधून वेळ मिळत नसावा , मुर्ख कुठली . क्लास मध्ये आम्हाला खूप सुंदर शिकवलं त्यांनी . आमच्या ग्रुप मधली फक्त सविता आणि मी क्लास लावला असल्याने आम्हाला बाकी सगळे चिडवत असायचे . पण शेवटी काही अडले तर आमच्याशिवाय कोणीच नव्हते त्यांना . खूप सुंदर दिवस होते .
गावाकडेपण माझ्या आत्याचा मुलगा किशोर ग्रामसेवक झाला .  माझ्या वडिलांनी मला एक दिवशी फोन करून सांगितलं . मी अरे वाह खूप छान  म्हणून दादही दिली . आमच्यात लहानपणापासून स्पर्धा वगैरे कधी नव्हतीच कारण मी पहिल्या क्रमांकाने पास होणारी होते आणि त्याने रडत कढत दहावी पास केली होती पण त्याने मात्र मोठी उडी मारली होती आता . वयाच्या बाविसाव्या वर्षी ग्रामसेवक म्हणजे चांगली प्रगती होती .

No comments:

Post a Comment