क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 10

सविताचा वाढदिवस होता. तिचे वडील कॉटन फेडरेशन मध्ये मोठ्या पदावरचे अधिकारी होते. आमच्या पूर्ण क्लासला हयात हॉटेल मध्ये पार्टी दिली. एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये पहिल्यांदाच आले होते. पायातल्या चपलेपासून डोक्याच्या बो पर्यंत सगळ्याची लाज वाटत होती. तिथला झगमगाट मला प्रचंड अस्वस्थ करून गेला.
आम्ही उशिरा रूमवर आलो. माझे वडील आलेले होते . मी बाकीच्या मैत्रीणीना सांगून ठेवायला विसरले होते. फोन आला तेव्हा पार्टी चालू होती. मला कळलेच नाही त्यांचे दोन तासांमध्ये ३० ते ४० वेळा आले होते. बाबा भयंकर चिडले होते.  गेले तीन तास त्यांनी माझ्या विषयी नाही नाही तो विचार केला .त्यांची समजूत काढता काढता नाकी नऊ आले. आईने मला आवडणारं भरीत करून दिलं होतं . पण पार्टी मध्ये खूप खाल्लं असल्याने पुन्हा  खाणं शक्यच नव्हतं. बाबांना ते खटकलं असावं. पण नाईलाज होता. मलाही ते बरं वाटलेलं नव्हतं.
आमच्या घर मालक काकांनी एक चांगली सोय केली होती. आमच्या कुणाच्याही घरून कुणी आलं की ते एक खालची रूम देत असत. अर्थात त्याचे १०० रुपये वेगळे घेत असत पण बाहेर गावाहून आलेल्या आमच्या नातलगांची सोय होत असे. बाबा तिकडे थांबले. मी दुसऱ्या दिवशी कॉलेजला टप्पा मारला. शी किती वेगळीच भाषा शिकले होते मी …. गंडलं । टप्पा मारला …. टोम्पी … असो …
आईने बनवलेलं मी सकाळी शिळं  असून पण खाल्लं. आफ्टर ऑल माझ्या बाबांनी इतक्या दुरून माझ्यासाठी आणलं होतं आणि आईने प्रेमाने बनवून दिलं होतं.
मी बाबांना माझं कॉलेज दाखवलं. त्यांना खूप म्हटलं कि चला आपण सिटी प्राईडला पिक्चर दाखवते पण ते ऐकेचना मग मी त्यांना मस्त मॉल मध्ये फिरवून आणलं. बाबा नाराज होते … मलाही चुकल्या चुकल्यासारखं वाटलं. त्यांनी कशातच इंटरेस्ट दाखवला नाही. एका वेगळ्याच काळजीने त्यांना ग्रासलं होतं. त्यांना सांगता येत नव्हतं , व्यक्त होता येत नव्हतं. आणि म्हणून त्यांना त्रास होत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी त्यांना बसवून दिलं. तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते. बेटा काळजी घे…. अभ्यास कर आणि पैसा जपून वापर असं वारंवार सांगत होते. मलाही हुंदका दाटून आला . माझे पप्पा पाहिल्यासारखे माझ्याशी वागले नाहीत हे खूप बोचत होतं. 

9 comments:

  1. सर , खूपच छान लिखाण आपले हातांने होते आहे .आपली प्रतिभा खूप प्रघलभ आहे . तुम्ही असेच लिखाण करत राहावे .हि देवाने दिलले देणगी आहे जी सगळ्या लोकाकडे नसते महणून तिला चांगले वळण देयून अजून जास्त चांगले देणे यासाठी प्रयंत्न करावा. तुमची भाषा ओघवती आहे , शब्दफेख चपालक बसते आहे.लिखाणासाठी हार्दिक शुभेछा!!!!!!

    ReplyDelete
  2. Its very interesting Mahendra.. Waiting for the next story.....

    ReplyDelete
  3. Nice story sir.. I have read all 10 parts and waiting for upcoming..

    ReplyDelete