तुम्हाला एखादी मुलगी आवडते



तुम्हाला एखादी मुलगी आवडते आणि तुम्ही तिच्या मागे अमोल पालेकर स्टाईल ने फिरता ....
पाठलाग करणं हा गुन्हा नाही .... छेडछाड करणं उगाच अंगचटीला येन हा गुन्हा आहे .....
तुम्हाला एखादी मुलगी आवडते आणि तुम्ही तिला डायरेक्ट प्रपोसं टाकता ....
प्रपोसं टाकणं करणं हा गुन्हा नाही .... ती नाही म्हटल्यावरही पुन्हा वाट्याला जाण हा गुन्हा आहे .....
वर्गातल्या मुलीकडे (सरांच्या नकळत ) टक लावून बघत ..... टक ...लावून बघणं गुन्हा नाही ....
शील घालणं .... उगाच काहीतरी हस्तपल्लवी नेत्रपल्लवी करणं .. हा गुन्हा आहे
फेसबुकवर एखाद्या मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता ... पाठवणं गुन्हा नाही .....
त्या मुलीचे फोटो चोरून बनवत अकौंट उघडणं आणि त्रास देणं हा गुन्हा आहे .....
कुणावर प्रेम करणं हा गुन्हा नाही .... कुणावर प्रेमाची सक्ती करणं हा गुन्हा आहे ...(3 jan 2013)

No comments:

Post a Comment