बिंदू.... रेषा आणि त्रिकोण ...........:)


वाचकांची घेऊन आलोय नवी प्रेमकथा .....
आज शुभारंभ .....
हा एक Montage !!!!
पूर्ण कथा यथावकाश प्रकाशित करतो....
कथेतील पात्र व घटना काल्पनिक असून वास्तविक त्यांचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही हे सुज्ञ व जाणकार तसंच चाणाक्ष वाचकांना वेगळे  सांगायला  नको
"समीक्षा करावी मात्र माझ्या आयुष्याशी त्याचा संबंध लावण्याचा प्रयत्न करू नये........ "
 



तुला विसरणं शक्य नाही....आणि तू माझी होणा या जन्मात तरी शक्य नाही....
 तुला इतक्या वेळा वेगवेगळ्या मार्गांनी परावृत्त करून बघितलं  पण तुझा आपलं तेच ...... 
तुला माझं प्रेम कळलंच नाही कधी....
.....आणि आता मी हट्ट सोडला म्हणून कळणारही नाही या जन्मात तरी ....
पण खरा सांगू का तुझ्यापासून दूर जाण्यासाठी खूप अट्टाहास केला.... तुझ्याशी तोडून बोलणे हा त्यातलाच प्रकार ....
     आणि कायम त्याच विवंचनेत राहणं मला जीवघेणं वाटत होतं ...
सगळ्याच बाजूनी कोंडी झाली होती .... अगदी आत्महत्ते पर्यंत विचार करून झाले ...
नंतर माझेच जुने विचार आठवले ....
कुणाला तरी विसरायचे  म्हणजे दुसऱ्या कुणाला तरी आयुष्यात आणावे लागेल
नाहीतर आयुष्याची राखारांगोलीच !!!
प्रेम त्रिकोणात नकोच .... ते असावे सरळ रेषेवर .....
त्रिकोणाचा चौकोन पंचकोन षटकोन होऊ शकतो .... अगदी वर्तुळ सुधा होऊ शकते.... पण रेषा नाही होऊ शकत ......
त्रिकोणाची रेषा करायची  असेल तर एका बिंदुला आपलं हट्ट सोडावाच लागतो..... नाही का???
आणि मी तेच करतो आहे.. त्रिकोणाचा कोन सोडून  ........ दुसऱ्या  बिंदूच्या शोधात ... :)


3 comments: