क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 12

खरं  तर आत्याच्या मुलाने ग्रामसेवक व्हावे ही आमच्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट होती . पण माझ्या आयुष्यात मात्र उलथापालथ करून गेली . लगोलग आमच्या लग्ना संबंधी बोलणी होऊ लागली . इथे माझ्याच वडिलांनी आत्याला विचारलं माझी मुलगी करशील का म्हणून . त्यांनी विचारलं असतं तर गोष्ट वेगळी होती . त्यामुळे मी  कात्रीत सापडले . मला खरं तर किशोर कधीच आवडला नाही . तो निर्व्यसनी होता , मनमिळावू होता तरी पण आमच्या दोघांच्या विचारसरणीत जमीन आसमान चा फरक होता .
मला खरं तर माझ्या लहान भावाकडून कळलं की बाबा माझ्या रूमवर येउन गेले तेव्हापासून अपसेट होते , आणि माझ्या लग्नाचा विचार करत होते . किशोरच्या निमित्ताने त्यांना संधी आयतीच चालून आली होती . मला खूप वाईट वाटलं . माझ्यावर अविश्वास म्हणून हे लग्न होत होतं तर !!!!
मला बाबांनी फोन केला आणि एका गुरुवारी घरी येत येईल का अशी विचारणा केली . मी नाही म्हटलं . माझी युनिट टेस्ट होती . खरं तर मी येऊ शकले असते पण ते का बोलावत होते हे मला कळून चुकलं होतं . लग्ना संबंधात काही असणार म्हणून मी घरी जाण्यासाठी टाळाटाळ करू लागले . न राहवून मी माझ्या आईला फोन केला आणि तिला मी लग्न नाही करू शकत किशोरशी असे सांगून टाकले .
बाबांचा मात्र वेगळाच गैरसमज झाला . माझ्या आयुष्यात दुसरं कुणी असेल असे त्यांना वाटलं . त्यांनी कसलाही विचार न करता मला त्यासंबंधाने विचारले . मी कळवळून म्हटले बाबा तुम्ही म्हणाल तिथे मी लग्न करीन पण असे आरोप माझ्यावर नका करू . खूप त्रास होतो मला .
याला दुर्दैवाने माझ्या होकाराचे स्वरूप प्राप्त झाले . मी मात्र तुटत होते माझ्यावरच्या अविश्वसामुळं . माझ्या मनाविरुद्ध लग्न होतंय याचा सगळ्यांनाच जणू विसर पडला . मी या गोष्टीमुळे खूप खचले . क्लासला जाणं बंद केलं .College मध्ये पण जावसं वाटायचं नाही .
माझी हि परिस्थिती बघून सविता मला तिच्या घरी घेऊन गेली . तिच्या आईला पण वाईट वाटलं . काकू म्हणाल्या  "असं  कसं करू शकतात तुझे वडील . आणि २० वर्षे म्हणजे काय लग्नाचं वय आहे का ??? कुठल्या जगात वावरताय तुझे वडील !!!! तू या सगळ्याचा ठामपणे विरोध करायला हवा . काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे कि नाही . "
मी फक्त सुस्कारा टाकला . २० वर्षे लग्नाचं वय नाहीय ही संकल्पना पुण्यातच मान्य होऊ शकते . माझ्या गावातील कित्येक भगिनी वयाच्या १६ व्या वर्षीच लग्नायोग्य होतात . कुणाला सांगणार

No comments:

Post a Comment