केव्हा तरी पहाटे........ :)

एक कलाकार होता.... हातात कला होती.... लेखनाची का होईना पण कलाच ती.....
त्या कलाकाराने एक कल्पना केली..... त्याला जे हवे होते जसे होते तसे एक काल्पनिक नाव देऊन त्याने गारव्यात मांडले......
गारवा म्हणजे काय हे तुला किवा त्याला ओळखनाय्रा सगळ्यांना माहित आहे..... आणि ज्यांना माहित नाही त्यांना सांगण्याची गरज नाही.....
कलाकाराने आपल्या लेखणीने तिला कोरले..... जसे एखाद्या शिल्पकाराने शिल्प कोरावे..... आणि आपल्याच कलेच्या प्रेमात पडला.....
त्या कल्पनेसारखी कुणी ह्या जगात आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला...... पण दुर्दैव त्याला त्याच्या कविता जिवंत करील असे कुणी सापडत नव्हते.....
त्याची कल्पना फक्त सुंदर आहे म्हणून कागदोपत्रीच शोभिवंत होती..... मूर्त रूप येण्याची त्याची अपेक्षा काही केल्या सफल होत नव्हती...... शेवटी वैतागला आणि शोकेस मध्ये ठेवलेल्या शोभिवंत गोष्टींप्रमाणे त्याने गारवा जपून ठेवला..... पेंढा भरलेल्या पोपटासारखा......
पण त्याच्या आयुष्यात तू आलीस आणि सगळे संदर्भच बदलले..... कारण तुझी प्रत्येक गोष्टच गारव्यात दडवलेल्या "तिच्यासारखी होती..." तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि त्याची कविता फेर धरून नाचू लागली..... पेंढा भरलेल्या पोपटाला नवीन संजीवनी मिळाली..... एक चक्र पूर्ण झाले..... त्याच्या गारव्यासारखी कुणीतरी तर ह्या जगात होती.....
त्याला तुला मागण्याची हिम्मत होती....... पण अफसोस तू गारव्यातील प्रत्येक कविता आहे याची जाणीव त्याला झाली तेव्हा फार उशीर झाला होता........... तू त्याची होऊ शकत नव्हती...... त्याची चिडचिड.... त्याचा त्रागा..... त्याचे अश्रू..... हळवेपणा...... सगळेकाही तूच होतीस......... पण फार उशीर झाला होता...... जेव्हा याची जाणीव झाली....... आणि तुला त्याची प्रीत कळेल तेव्हा कळेल..... आणि नाही कळली तरी तो समाधानी आहे.....
कारण त्याचे प्रेम चंदनासारखे आहे........ शुद्ध...... फळे न येत देखील ते कृतार्थ झालेले असेल.........


सकाळ झाली होती आणि आईने माझ्या तोंडावरची चादर बाजूला केली....... मग मी भानावर आलो......... फार उशीर झाला होता........... सकाळचे ७:३५ झाले होते......... तू स्वप्नात होतीस आणि "स्वप्नं" जाग आले कि मिटतात एवढी जाणीव त्याला करून देतो......... [ तो म्हणजे मी नव्हेच ...... ]

 

No comments:

Post a Comment