क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र18

 मुली हुडीज मुडीज ट्यूब टॉप काय काय घालायच्या मला पण वाटायचं आपण पण घालावं . सुंदर दिसावं . किशोर साठी नटावं . 

साखरपुडा झाला असला तरी आम्ही मर्यादा सोडली नव्हती . 

किशोर ने पाहिल्यानंदा मला ड्रेस आणला , तो पण maxi ड्रेस . माझा भोळा शंभू महादेव . मी म्हटलं आणि किशोर ने ते आणलं नाही असं कधीच व्हायचं नाही .

मी पण स्कॉलरशिप मधून त्याच्यासाठी मस्त गॉगल घेतला होता . म्हणजे दोघांसाठी घेतले होते खरंतर . कपल गॉगल . 

भान हरपून आम्ही एकमेकांवर प्रेम केले . 

स्वतःला हसू यायचं की आपण किती आढेवेढे घेतले होते या लग्नाला .. 

अमिताभ चा तो मुव्ही आहे ना सुर्यवंशम तसा कष्टाळू मेहनती होता माझा किशोर . मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी मलाही आकर्षण होतेच ना किशोर बद्दल पण वाटायचं आपण इंजिनिअर होणार मग कसं जमणार हे ,  व पु काळेंची लाईन आहे ना  कागदाला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं.. तसा माझा डिग्रीचा  अहंकार होता . किशोरच्या प्रेमाने पार विरघळवून टाकला. 

दिवस झपाझप चालले होते , शेवटच्या वर्षाचे पाहिले सेमिस्टर संपले . कॉलेज सोडायची हुरहूर लागली होती. 

चार वर्षांतले सगळे सुख दुःखाचे दिवस आठवत होते. माणसाने आयुष्यात एकदा तरी हॉस्टेल किंवा रुमवर राहावे . स्वातंत्र्य उपभोगून बघावे . 

आपल्या आपण काही गोष्टी manage करण्यात खूप वेगळा आनंद आहे. 



No comments:

Post a Comment